महादाइसी म्हणितले ,जी जी ,आम्ही तुम्हासी दंडवतेकरीत तर गोसावी कायी म्हणती जी ?
यावरी सर्वज्ञे म्हणितले ,बाई हे ऐसे म्हणे ,जे जीव सर्व दोषाचे आळे तर तया सर्व दोषापासौनि चैतन्या पर परमेश्वर तो देवो तुम्हा रक्षी ऐसे म्हणती की बाई. यावरूनच देवरक्षो ऐसा शब्दे आशिर्वाद प्रचलीत झाला असावा असे वाटते.तसेच पुढील दंडवत करणार्या व्यक्तीस देवरक्षो या शब्दाने वासनीकास चार प्रकारचे आशीर्वाद घडतात.असे एका संशोधन कर्त्याने अर्थ लावला आहे.
जसे ,"दे+व+र+क्षो "यात 'दे'म्हणजे देतानी शत आयुष्यानी, शंभर वर्षाचे पूर्ण आयुष्यमान होवो ! 'व' म्हणजे म्हवंकारे वंशवृध्दीनाम् वंशाची वाढवृध्दी होवो ! 'र' म्हणजे रक्षन्ते सर्व पापानि -सर्व दोषांपासून रक्षण होवो ! 'क्ष' म्हणजे क्षालनम् भव नाशनम् -भवनाम् संसाराचे क्षालन होवो ! या प्रकारचे चार आशीर्वाद मिळतात. करिता वासनीकाने भिक्षुकास नम्रतापूर्वक दंडवत प्रणाम अवश्य करावा.थोर लाभ असे ! पुज्य मानावे .
सौजन्य - ई.श्री. भाईदेव बिडकर फलटण
प्रसादसेवा स्तोत्र.....On Youtube



No comments:
Post a Comment