💥💥💥💥💥💥💥💥
वोडनझडपा गृही क्रिडा : ऋद्धपुर
-----------------------------
स्थानाची माहिती :
वोडनझडपा गृही क्रिडा : ऋद्धपुर
-----------------------------
स्थानाची माहिती :
हे स्थान राजमठा पासुन विश्राम गृहाकडे जातांना जवळच रस्त्याच्या डाविकडे छोट्या मंदिरात आहे. त्या ठिकाणी राजदरबारचा शिपाई वोडनझडपा पत्नी सह राहत होता.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
लिळा:-
ऋद्धपुर मधे जरी श्री गोविंद प्रभु दररोज क्रिडा करीत होते, तरी अद्याप ते वोडनझडपाच्या घरी कधी गेले नव्हते. कारण तो शिपाई पदावर होता, व स्वभावाने अतिशय ख्वाष्ट.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
लिळा:-
ऋद्धपुर मधे जरी श्री गोविंद प्रभु दररोज क्रिडा करीत होते, तरी अद्याप ते वोडनझडपाच्या घरी कधी गेले नव्हते. कारण तो शिपाई पदावर होता, व स्वभावाने अतिशय ख्वाष्ट.
एके दिवसी गोसावी क्रिडा करीत त्याच्या घरी गेले, सोबत माहीमभट्ट, व आचार्य होते. गोसावी घरात बीजे करतील म्हणून वोडनझडपाची पत्नी दारात उभी राहीली. आत मधे जाउ देइना. श्री प्रभु म्हणाले, “ आवो मेली जाए, परती होएना म्हणे : परती जाए : परती जाएना म्हणे : अवो मेली परती होएना म्हणे :” तरी ती परत फिरली नाही. मग गोसावी कोपु स्विकारला. आलोहीत वाम नेत्र उघडला : अधर कापु लागले, आणि म्हणाले, “ आवो मेली जाए तू परती म्हणे : ” व पाठीवर एक थाप मारुन तिला ढकलून दिले. ती रडत पडत दारातच उभी राहीली.
गोसावी आत आले व उतरंडी उतरु लागले. दोन्ही हाता मधे धान्याची मडकी घेउन जोर जोराने श्वास घेत मधे आणून रिचवित. व रिकामी मडकी दारात नेउन फोडली. सिंक्यावरचे दही, दूधाची मडकी मधे आणून ठेवली. तिळ, तांदूळ, साळी, गुळ, गहु, उडीद, मुग, चणे, तुरी, राळे, चवळी, भादली, तुर डाळ, उडीद दाळ, चणा डाळ, वडे, पापड, सांडया, कुरडया, असे सर्व एकत्रित करुन त्या राशीवर आडासनी श्री चरण मधे घालुन त्यावर बसले. भट, माहिमभट्ट ईवलीसी तोंडे करुन बघू लागले. भट्ट म्हणाले, “माहिमभटो आता काय करावे.? तो दुष्ट राजपुत आता येईल. त्याला काय उत्तर द्याव.”
एव्हड्यात पैलाकडून वोडनझडपा येतांना बघीतला..! भट्ट, माहिमभट्ट समोर गेले व म्हणाले, “ वोडनझडपे हो आज गोसावी तुमच्या गृही बीजे केले असे. ” तो म्हणाला बरे झाले, कधी नव्हे तर आज माझ्या घरी बीजे केले. दैव भाग्य माझ." तुमच्या स्त्री ला पाठीवर हाणले. ती गोसावियांना आत मधे येउ देत नव्हती म्हणून. तो म्हणाला, “ भली हाणीतली, राउळांना कां आत येउ देत नव्हती..? राउळ विणाकारण का मारतील.. भट म्हणाले, “तुमच्या उतरंडीचे मडके फोडीली. ” तो म्हणाला, माझी खापराची फोडली तर, गोसावी मज तांबा, पितळेची देतील..” भट म्हणाले, तुमचे सर्व धान्य नासविले.” तो म्हणाला, “ राउळांनी माझे पाप नासले, मी कृत्याकृत्त झालो. मग तो घरा मधे आला.
गोसावी घरातच होते. त्याला पाहीले व भय स्विकारले, व बाहेर निगू लागसे. मग तो म्हणाला, “जी जी आता पर्यंत गेले असता तर ठिक होत, आता कसे जाल”, व समोर आडवा पडला.
मग भट, माहिमभट्ट म्हणाले, प्रभु विनंती स्विकारा यांची. श्रीप्रभुंनी विनंती मान्य केली. म्हणाले, “अवो मेला जाए, उठी उठी म्हणे :” मग तो उठला, बाज सुपवती घातली, त्यावर चादर अंथरली, घर स्वच्छ केले. सडा समार्जन केले. रागोळ्या काढल्या. बाजारा मधुन कणिक, तांदूळ आणले, माहिमभटांनी उपहाराची तयारी केली. वोडनझडपाने गोसावियांना मर्दना मादने दिधले, नवीन वस्त्र ओळगविली. पुजावसर झाला. आरोगणा झाली. गुळूळा, विडा झाला. भटा, माहीमभटांची गोसावीयांचे दृष्टिसमोर जेवणे झाली. वोडनझडपा म्हणाला, “ जी: जी गावा वेगळा अपवित्र होता जी, अनाथ अपवित्र होता जी, आज पवित्र, सनाथ केला जी.”
मग भट, माहिमभट्ट गोसावीयांसोबत मढात बिजे केले. ओडनझडपा मढापर्यंत बोळवित आला. त्या दिवसा पासुन गोसावी मधुन त्याचेकडे जात. तेंव्हा पासुन वोडनझडपाच्या घरात तांब्याची भांडी आली. जरी सोन्या चांदीची मागीतली असती तर सोन्याची झाली असती. (ऋ.च. उत्त.९०)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
साधेराज दर्यापुरकर@_रिद्धपुर.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
साधेराज दर्यापुरकर@_रिद्धपुर.
दंडवत प्रणाम
..
..
No comments:
Post a Comment