Wednesday, 4 April 2018

वाकी वेसीशी खेेेळ करणे स्थान: रिद्धपुर

वाकी वेसीशी खेेेळ करणे स्थान: रिद्धपुर
~-~-~-~-~-~-~-~-~-~-~-~-~-~-~

      हे स्थान सर्वतिर्थ मंदिराच्या मागे दोनशे मिटर अंतरावर आहे.
                            *****
लीळा :
            सकाळी पुजावसर झाल्यावर एखाद्या दिवसी श्रीप्रभू दुडु-दुडु धावत वाकी वेसी जवळ उभे राहत असत. ते लावलेले असेल तर त्यांची आगळ काढीत. आणि दरवाजा लोटीत तेंव्हा त्याचे चाक करा-करा वाजे. परत लोटीत, पुन्हा आवाज निघाल्यावर म्हणायचे, "आवो मेला जाए : बोबाते म्हणे :" म्हणून पुन्हा लोटल्यावर ते पुन्हा करा-करा वाजायचे, "आवो मेला जाए नको बोबावो म्हणे:" म्हणून दरवाज्याला श्रीचरणाने हाणीत आणि हास्य स्विकारीत.
वेसी वरील घोड्याशीही खेळ करीत. त्याच्या मानेवर थापटीत. मग बीजे करीत.
[गो.प्र.च.९८]
                          -^-^-^-^^-
सा. दर्यापुरकर ____________@__रिद्धपुर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment