रुपनायका भेटी : ऋद्धपुर
हे स्थान राजमठा शेजारी प.पु.प.म.श्री पाचराउत बाबा यांच्या मठामधे आहे.
लिळा
आमच्या सर्वज्ञांचे वास्तव्य जोगेश्वरी येथे असतांना, एके दिवसी साधेस म्हणाले, " साधेहो तुम्ही परमेश्वरपूर निघालात तर मामेयाचे घरी जेवाल की, भिक्षा कराल ?" साधे म्हणाल्या, " हां जी.. गोसावी मामांना कस काय ओळखतात..?" यावर सर्वज्ञांनी या लीळचीे गोष्ट सांगीतली.
गोसावियांना दाभेरी येथे दर्भेश्वराच्या देवाळात बाळाणेयावर आसन होते. तेंव्हा रुपनायक आले. त्यांनी स्वामिंना पाहिले, समोर आले व दंडवत केले, श्रीचरणा लागले. रुपनायकांनी विनंती केली, "जी जी.. गोसावी माझ्या आवारा बीजे करावे जी." गोसावियांनी विनंती मान्य केली. स्वामिंना घोड्यावर बसवून रुपनायक आपल्या आवारासी घेउन आले.
ओलणी दिली, मग गोयावियांसी मर्दना मादने झाले. पुजा केली. तेंव्हा साधा म्हणाल्या, " हां जी ते पुजा करु केंवी जाणती..?" तेंव्हा सर्वज्ञ म्हणाले, "बाइ ! ते आगमीक : पुजा करु जाणती. मग गोसावियांना दुधा-तुपा सोबत आरोगणा झाली. गुळुळा विडा झाला. मग पहूडू झाला. मग सकाळी दाभेरीस बीजे केले. (ली.च पू.४०)
__________________________________
शब्दार्थ : बाळाणे = कठडा/सज्जा. ओलणी = आंघोळीच्या वेळी नेसायचे वस्त्र. आगमीक = तंत्र जाणनारा.
__________________________________
सा.दर्यापुरकर....@ रिद्धपुर.