Wednesday, 14 February 2018

श्री गोविंद प्रभू लिळा



*देवाळा ब्राह्मणाचे अन्न आरोगणा :*
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
*लीळा:*

      रिद्धपुर हे त्यावेळी मोठ पेठेच गांव. रिद्धपुर परगण्यातील खेड गांवच्या एका ब्राह्मणाची लेक रिद्धपुरला  दिलीे होती. एके दिवसी बाजारच्या दिवसी काही कामासाठी रिद्धपुरला जायच ठरलं. पत्निला म्हणाला, "राउळांनी रिद्धपुर मधे सगळीकडे कालवाकालव केली असेल तरी माझ्यासाठी  शिदोरी तयार कर. वाटेत कुठे तरी जेवन करुन मग रिद्धपुरला जाईल." म्हणून शिदोरी व दही-भात सोबत घेउन रिद्धपुरला निघाला.

          रिद्धपुरला देवाळा तळ्याजवळ आला, मनात म्हणाला, आता स्नान करू व मग जेवन कराव! पण राउळांनी पहिले तर ते अवघ भ्रष्टाभ्रष्ट करतील म्हणून तळ्याजवळ पश्चिमेला वैजनाथाच्या मंदिराजवळच्या पिंपळाला शिदोरीच गाठोड बांधुन ठेवल व तो स्नान करण्यास गेला.

          तेंव्हा गोसावी तेथे बिजे केले. व पिंपळाला बांधलेली शिदोरी सोडून तेथेच आरोगणा सुरु केली. ब्राह्मणाचे स्नान आटोपून मागील वास पहिला तर, श्रीप्रभू  आरोगणा करत असल्याच बघून त्याची कुमती हरली. सामोरा आला व दंडवत केले. म्हणाला, " राउळ ईश्वर पुरुष : माते पवित्र करावया येथ बिजे केले : माझे दैवभाग्य : राउळाविन काइ कवनी ठाव असे :" राउळ माए : राउळ बापु :" म्हणून श्रीचरणा लागला. सर्वज्ञे म्हणाले, " आवो मेला जाए : आता होए म्हणे :" मग गोसावी बीजे केले. नंतर ब्राह्मणाने तो उचिष्ट प्रसाद सेवन केला. (रि.च.पू.६४)

दंडवत प्रणाम..

🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
*इ.साधेराज दर्यापुरकर __@रिद्धपुर.*
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠

No comments:

Post a Comment