*जाईच्यादेवाची जत्रा..*
आम्ही तेंव्हा ५,६ वर्षाचे होतो, घरामधे आई वडीलांची जा.देव यात्रा बद्दल झालेली बोलनी कानावर पडली की, दांडीपुनवेच्या दिवसाचे वेध लागायचे.
अखेर तो दिवस उजाडायचा.
आधल्या दिवसी सकाळीच निघून त्या वेळच्या खाजगी मोटारीने चिखली, बुलडाणा ते पाडळी पोचायचो (पुढे बस जात नव्हती)
तेथून बैलगाडी करुन (४आणे भाड आम्ही फ्री.) सायंकाळी जा.देव पोचायचो.
जत्रेतील ओळखीच्या दुकानामागे तो दुकानदार जागा करुन ठेवायचा.(reservation) सोबत नेलेल्या गोनपाटाला, सतरंजीला केल्या बघून निवारा तयार.😃
रात्री सोबतचे जेवन करुन मुक्काम.
सकाळी वडील काड्या, गोवऱ्या जमा करुन आणीत किंवा आणा दोन आण्यात विकत आणीत. २ आण्याचा माठ [जो आज ५० रु.चा मिळतो] ४ आण्याच डबाभर पाणी घेउन स्वयंपाक सुरु व्हायचा. वरण, भात, भाजी व रोडगे. मग उपहार, विडा घेउन देवाला जायचं. देवदर्शन उपहार विडा करुन परत ठिकाऩावर येउन जेवन व नंतर जत्रा.
त्या दिवसी मुक्काम करुन सकाळी आलो तसेच परत..
ते दिवस आजही आठवतात.
नंतरही गेलो, नेहमी जातो पण ते नाही लक्षात राहीलं..
दंडवत प्रणाम..🙏🙏
साभार - साधेराज दादा दर्यापुरकर
या ठिकाणचे फोटो मेल करू शकता का vgurav492@gmail.com
ReplyDelete